army-man-murdered-father-in-law-chikodi-taluka-itnal-village-202010.jpg | बेळगाव : माजी सैनिकाच्या मारहाणीत सासरा ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : माजी सैनिकाच्या मारहाणीत सासरा ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिकोडी : तालुक्यातील इटनाळ गावात माजी सैनिक बाळेश श्रीकांत बोरन्नावर (वय 38) याने सासर्याला ठार केले आहे. रविवारी रात्री एक वाजणाच्या सुमारास चिक्कोडी तालुक्यातील इटनाळ गावात ही घटना घडली आहे. 10 वर्षापूर्वी इटनाळ गावचा रहिवासी असलेल्या श्रीकांतचा मुलगा बाळेशचे लग्न मूळचे करोशी गावचे रहिवासी असलेल्या सिद्दप्पा खोत यांची मुलगी संगीता हिच्याशी झाले होते. पण मुले होत नव्हती म्हणून नवरा बायकोचे सतत भांडण होत होते.
6 महिन्यांपूर्वी जवान सैन्यातून निवृत्त झाला. शेतातील घरात राहत असल्याने त्यांच्या शेजारी घरे नव्हती. मुल-बाळ होत नसल्याने दिवसभर पती-पत्नीचे भांडण होत असे. मयत सासरा सिद्धप्पा रायप्पा खोत (वय 58) हे दसरा उत्सवासाठी आपल्या मुलीच्या घरी आले होते. संध्याकाळी दारूच्या नशेत पत्नीशी भांडण सुरु झाले आणि भांडण विकोपाला गेले. यावेळी सासरा भांडण सोडायला गेला असता निवृत्त जवानाने पीव्हीसी पाईपने मामाचे डोके फोडले. यात सासरा अर्थातच मामा गंभीर जखमी झाला.
चिक्कोडीच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना सासरा सिद्दप्पा यांचा मृत्यू झाला. जिल्हा एसपी लक्ष्मण निंबरगी आणि चिक्कोडीचे डीवायएसपी मनोज कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय आर. आर.पाटील आणि पीएसआय राकेश यांनी घटनेनंतर फरार झालेला संशयित आरोपी बाळेश याला अटक केली. याप्रकरणी चिककोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.