Camp-Police-Station-Belgaum-Arrested-Two-Interstate-Robbers-Daroda-Home-Belgaum-202010.jpg | बेळगाव : कँप पोलिसांच्या कारवाईत जवळपास 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघा जणांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : कँप पोलिसांच्या कारवाईत जवळपास 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघा जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील कॅम्प पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोघा आंतरराज्य दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 28 लाखाहून जास्त किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच 1 मारुती सुजूकी बलेनो कार जप्त केली आहे. यासंबंधी माहिती देताना डीसीपी सी. आर. नीलगार यांनी हे आरोपी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. प्रशांत काशीनाथ करोशी (वय 35, रा. इप्सुरली ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अविनाश शिवाजी अडावकर (वय 28, रा. धामणे ता. अजरा जि. कोल्हापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बेळगाव हिंडलगा भागातील नक्षत्र कॉलनीतील 20 जानेवारीला आस्टनजान डीअल्मेडा आसीस डिल्मेडा रा. लक्ष्मीटेक नक्षत्र कॉलणी) यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दिली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. पोलिसांनी संशयाने वरील दोघांना ताब्यात घेउन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चार घरफोड्या केल्याची कबुली दिली. वरील दोघेजण चोरीच्या उद्देशाने गुगल मॅपव्दारे शहराबाहेरील घरांची माहिती घेत होते. 28 लाख 8 हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच 11 लाख 50 हजार रुपये किमतीची 1 मारुती सुजूकी बलेनो कार जप्त करण्यात आली आहे. गुगल मॅप वरुन शहराबाहेरील घरांची माहिती हे गोळा करीत असत. ह्या आरोपीना अटक केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त के. त्यागराजन, एसीपी सी. आर. नीलगार, एसीपी चंद्रप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे सीपीआय डी. संतोषकुमार आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

एसीसीबीच्या पथकाची मदत
बेळगावात घरफोडी करुन पुन्हा रातोरात कोल्हापूर गाठणाऱ्या वरील दोघा संशयिताबद्दल कॅम्प पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार कॅम्प पोलिसांचे एक पथक कोल्हापूरात दाखल झाले. त्यांनी स्थानिक गुन्हे तपास पथकाला (एलसीबी) ही माहिती घेऊन तपासासाठी त्यांची मदत घेतली. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी संयुक्‍तरित्या तपास मोहिम हाती घेऊन अखेर त्यांच्या मुसक्‍या आवळल्या.

चार प्रकरणांचा उलगडा
वरील दोघा संशयिताना ताब्यात घेऊन त्यांना बेळगावात आनण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकून चार ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्युासार त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.