belgaum-city-matka-bookie-arrested-three-persons-kadolkar-galli-and-rayat-galli-vadagav-202010.jpg | बेळगाव शहरात मटका घेणाऱ्या तिघांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात मटका घेणाऱ्या तिघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पोलिसांच्या कारवाईत कडोलकर गल्ली आणि रयत गल्ली कॉर्नर, ढोर गल्ली येथे तिघा जणांना मटका प्रकरणी अटक केले आहे.
त्यांच्याकडून 9,205 रुपयांची रोकड, मटका चिठ्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कडोलकर गल्ली येथे मटका घेणाऱ्या दोघांना अटक
खडेबाजार पोलिसांनी शनिवारी (24 ऑक्टोबर) ही कारवाई केली. गौरव इराप्पा मंडोळकर (वय 26, रा. मेणसे गल्ली) आणि तुषार दिनेश रणसुबे (वय 20, रा. लक्ष्मीनगर, गणेशपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून 4,375 रुपयांची रोकड, मटका चिठ्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. कडोलकर गल्ली येथे मटका स्वीकारला जात असल्याची माहिती खडेबाजार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून वरील दोघांना अटक केली.
रयत गल्ली कॉर्नर, ढोर गल्ली विहिरीजवळ सार्वजनिक ठिकाणी थांबून मटका नंबर स्वीकारणाऱ्या बुकीला अटक
करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली आहे. अशोक आनंद सुतार (वय 52, रा. मलप्रभा पोटे रुग्णालयामागे, वडगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 4,830 रुपयांची रोकड जप्त केली आहे. रयत गल्ली कॉर्नर, ढोर गल्ली येथील विहिरीजवळ एकजण थांबून नागरिकांकडून मटका नंबर स्वीकारत असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सापळ रचून छापा टाकून अशोकला रंगेहात अटक करण्यात आली.
मुख्य मटकाबुकी महम्मदगौस शहापूर (रा. काकती) याच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सुतारने मटका नंबर व पैसे मुख्य मटकाबुकी महम्मदगौस शहापुरी याच्याकडे देत असल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करुन घेतला आहे.