matka-sheet.jpg | बेळगाव शहरात मटका प्रकरणी 4 जणांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात मटका प्रकरणी 4 जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रविवार पेठ, कांदा मार्केट येथे मटका खेळणाऱ्या चौघा जणांना मार्केट पोलिसांनी छापा टाकुन शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून 3,050 रु. रोख रक्कम जप्त करण्यात आली. अब्दुल कुतबुद्दीन हूक्केरी (वय 49, रा. उज्वलनगर), मोहन नारायण जाधव (वय 55, रा. आंबेडकर गल्ली), करण मारुती गुंजीकर (वय 25 रा. कामत गल्ली), गजानन गरडे (रा. कामत गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मार्केट पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हुवन्नावर यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी अधिक तपास करीत आहेत.