वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली... Mysuru–Darbhanga Bagmati Express Train Accident

वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली... Mysuru–Darbhanga Bagmati Express Train Accident

belgavkar.com | belgaum | belgavkar

मैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस...!
19 प्रवासी जखमी...

Mysore-Darbhanga Bagmati Express rams into goods train in Tamil Nadu

तमिळनाडूमधील कावराईपेट्टई स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. मैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस आणि एका स्थिर मालगाडीची टक्कर होऊन बागमती एक्स्प्रेसचे 12 ते 13 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 19 प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
माहितीनुसार, बागमती एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12578) कर्नाटकातील मैसूरवरुन डिब्रूगडला जात असताना कावराईपेट्टई स्थानकात प्रवेश करत होती. प्रवासादरम्यान, गाडीला मुख्य मार्गावरून जाण्यासाठी सिग्नल देण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे ट्रेन मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली आणि 75 किमी प्रति तास वेगाने स्थिर असलेल्या मालगाडीला धडकली. या धडकेमुळे गाडीचे 12-13 डबे रुळावरून घसरले.

मुख्यमंत्री एमके स्टालिनकडून बचाव कार्यावर लक्ष : या दुर्घटनेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी त्वरित मदत कार्य सुरू करण्यासाठी एक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तामिळनाडूचे मंत्री एस.एम. नासर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या टक्करीत सहा डबे रुळावरून घसरले आणि दोन डब्यांना आग लागली. या अपघातात एकूण 19 प्रवासी जखमी झाले, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर होती.

प्रवाशांसाठी मदतीची व्यवस्था : जखमी झालेल्या तिघांना सरकारी स्टेनली मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी या तिघांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर, उर्वरित 13 जखमी प्रवाशांना पोननेरी सरकारी रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. सर्व 1,300 प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. काही प्रवाशांची व्यवस्था लग्न हॉलमध्ये करण्यात आली आहे, जिथे त्यांना अन्न, पाणी आणि आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहेत. रिपोर्टनुसार, सध्या बचावकार्य सुरू असून दुर्घटनेचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Mysuru–Darbhanga Bagmati Express Train Accident

Tamil Nadu : Bagmati Express entered loop line where goods train was stationed

Mysore Darbhanga Bagmati Express rams into goods train in Tamil Nadu

Bagmati Express Accident

वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली... Mysuru–Darbhanga Bagmati Express Train Accident
मैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस...! 19 प्रवासी जखमी...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm