YouTuber ने ठोकली ₹ 1.7 कोटींची सुपरकार...

YouTuber ने ठोकली ₹ 1.7 कोटींची सुपरकार...

belgavkar.com | belgaum | belgavkar

YouTube star Jack Doherty crashes $200K McLaren while livestreaming गाडी चालवताना Live स्ट्रीम (Video)

YouTuber Jack Doherty crashes $200K McLaren sports car on Livestream; Kick bans account : लाइव्हस्ट्रीम करत त्याची सुपरकार चालवत असताना कार नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकली. या अपघातात कारमधील आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला, युट्युबर मात्र बचावला. YouTuber चे नाव जॅक डोहर्टी आहे. तो YouTube आणि Kickstreamer वर त्याच्या धाडसी स्टंटसाठी ओळखला जातो.
फ्लोरिडातील मियामी हायवेवर मुसळधार पाऊस पडत असताना हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, 20 वर्षीय कंटेंट क्रिएटर जॅक डोहर्टी त्याची 1.70 कोटी रुपयांची मॅक्लारेन सुपरकार चालवताना दिसत होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की जॅक ड्रायव्हिंग करताना लाइव्ह स्ट्रीमिंग देखील करत आहे. त्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटते आणि कार निसरड्या रस्त्यावरून पुढे घसपटते आणि रेलिंगला धडकते. व्हिडिओमध्ये YouTuber ओरडताना ऐकू येतो. त्यानंतर तो आणि त्याचा शूटिंग करणारा मित्र दोघेही कारमधून बाहेर आले. यूट्युबर फारशी दुखापत झाली नाही, पण मित्राला थोडी दुखापत झाली.
जॅकने McLaren सुपरकार $2,02,850.10 (म्हणजे 1.70 कोटींहून अधिक) ला विकत घेतली होती. व्हिडिओमध्ये, अपघात झाल्यानंतर जॅकला अपघातग्रस्त झालेली कार पाहून पश्चाताप होताना दिसला. त्याने स्वतः अपघातानंतर अनेक फुटेज शेअर केली, ज्यापैकी एकात तो खराब झालेल्या वाहनात अडकलेला असताना मदतीसाठी ओरडतानाची तणावपूर्ण क्लिपदेखील समाविष्ट आहे. रस्त्यावरून जाणारे लोक जॅककडे धावताना दिसले आणि तुटलेल्या खिडकीतून बाहेर पडण्यास मदत करत असल्याचेही दिसून आले. यूट्युबर जॅक डोहर्टीने काही व्हिडिओ हॉस्पिटलमधून शेअर केले.
या घटनेमुळे जॅकवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. नेटिझन्सने त्याच्या निष्काळजीपणावर प्रश्न केला. विशेषत : लाखो फॉलोअर्सवर त्याचा किती प्रभाव आहे हे लक्षात घेतले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म किकने तत्काळ कारवाई करत त्याचे अकाउंट बॅन केले.

पीपल्सच्या रिपोर्टनुसार, किकच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही चुकीच्या गोष्टींना अजिबात समर्थन देत नाही. या घटनेने सुरक्षा आणि जबाबदारीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जॅकने गेल्या वर्षाच्या शेवटी महागडी मॅक्लारेनला विकत घेतले होते, ज्याबद्दल त्याने त्याच्या YouTube चॅनेलवर अभिमानाने सांगितले होते. पण आता त्याने जे केले ते योग्य नाही.

YouTube star Jack Doherty crashes 200K McLaren while livestreaming

YouTuber Jack Doherty crashes 200K McLaren sports car on Livestream; Kick bans account

YouTube star with over 14 million subscribers SLAMMED after crashing 200K car live on stream

YouTuber ने ठोकली ₹ 1.7 कोटींची सुपरकार...
YouTube star Jack Doherty crashes $200K McLaren while livestreaming गाडी चालवताना Live स्ट्रीम (Video)

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm