बेळगाव : नवीन कारवर दगडफेक करुन तोडफोड

बेळगाव : नवीन कारवर दगडफेक करुन तोडफोड

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : घरासमोर उभारण्यात आलेल्या कारवर अज्ञातांनी दगडफेक करुन तोडफोड केली. रविवारी रात्री छत्रपती संभाजीनगर, पहिला क्रॉस, गणेश कॉलनी, वडगाव येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करून तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.
प्रथमेश मनोज काळे यांनी चार महिन्यांपूर्वी नवीन कार घेतली होती. नेहमीप्रमाणे त्यांनी घरासमोर कार उभी केली होती. कारची तोडफोड करण्यातआल्याची घटना आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी केलेल्या या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडगाव परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असतानाच आता घरासमोर पार्क करण्यात आलेल्या वाहनांचीही तोडफोड केली जाऊ लागल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे, तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Belgaum New car vandalized by stone pelting belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum New car vandalized by stone pelting

New car vandalized by stone pelting belgaum

बेळगाव : नवीन कारवर दगडफेक करुन तोडफोड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm