महिपालगड हा बेळगावपासून 20 किमी (12 मैल) अंतरावर असलेला किल्ला आहे. हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात आहे. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. बेळगाव—belgavkar—belgaum : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान बेळगाव विभागातर्फे सीमेवरील वैजनाथ येथील महिपाळगडाची स्वच्छता करण्यात आली आहे. या स्वच्छता उपक्रमात 25 युवक व युवती सहभागी झाल्या होत्या. तटबंदीवर वाढलेल्या वेली, गवत व वाढलेला कचरा काढून तटबंदी व गडाची स्वच्छता केली आहे.
त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी कल्याणी बसुर्ते, शीतल श्रीखंडे, गौतम आपटेकर, योगेश पवार, गार्गी पाटील, गजानन पाटील, शिवाली झुंजवाडकर, किशोर धूडुम, दीपक कडोलकर, अभी बांगरी, कीर्ती बामणे, प्रशांत हुंदरे, प्रमोद आवरेकर, निकिता गौंडवाडकर कार्यकर्ते उपस्थित होते.