बेळगाव—belgavkar—belgaum : दसरोत्सवासाठी शाळांना 18 दिवसांची सुटी मिळणार आहे. दि. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दसरोत्सवाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. सध्या परीक्षा संपल्या असून पेपर तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या सुटीनंतरच विद्यार्थ्यांना परीक्षांचे निकाल दिले जाणार आहेत. प्राथमिक विभागासोबतच माध्यमिक विभागाच्याही परीक्षा घेण्यात आल्या. सोमवारी समाज विज्ञान विषयाचा शेवटचा पेपर पार पडला.
मंगळवारी विद्यार्थ्यांना सुटीचा अभ्यास दिला जाणार असून बुधवारी महात्मा गांधी जयंती आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवार दि. 2 रोजी स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मध्यान्ह आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी किमान एक तरी झाड लावण्याची सूचना केली आहे.