National Highways Authority of India (NHAI)बेळगाव—belgavkar—belgaum : टोल दरात 1 एप्रिलपासून 3 ते 5 टक्के वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील एकूण 66 टोल प्लाझांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बंगळूर प्रकल्पाचे संचालक के. बी. जयकुमार यांनी ही माहिती कळवली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
टोल दरात कमाल 5 आणि किमान 3 टक्के वाढ असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नवे धोरण जारी केले आहे. त्यानुसार टोल दरात वाढ करण्यात येत आहे. टोलदरात वाढीमुळे वाहनधारकांवर त्याचा बोजा पडणार आहे. रस्ते विकास, दुरुस्ती आणि देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे टोलदर वाढवणे अनिवार्य बनले आहे.
राज्यातील बहुतेक मार्गावरील टोल दर वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाला, प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. टोलदरातील वाढीव रक्कम प्रवाशांच्या खिशातून वसूल केली जाणार हे निश्चित आहे. नियमितपणे टोलगेटवरुन जाणाऱ्यांना वाढीव दराचा अधिक फटका बसेल. वाहतूक व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा विकासासाठी टोल दर वाढवण्यात येत असल्याचे समर्थन केंद्रीय भू वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
