बेळगाव : एसआयटी चौकशीची मागणी

बेळगाव : एसआयटी चौकशीची मागणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

जुना पीबी रोड ते बँक ऑफ इंडिया रस्ता रुंदीकरण

बेळगाव—belgavkar—belgaum : जुना पीबी रोड ते बँक ऑफ इंडिया दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण बेकायदेशीर करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांसह महापालिकेचेही आर्थिक नुकसान झाले आहे. रुंदीकरण करत असताना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे सोपविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
रुंदीकरण करताना कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे सोपवण्यात यावी, अशा मागणी मुळगुंद यांनी केली आहे.
शहापूरातील बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुन्या पी.बी. रोडपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी घेतलेली जमीन मूळ मालकांना परत करा अन्यथा दंड आकारु, असा इशारा उच्च न्यायालयाने देताच प्रशासनाला जाग आली आहे. रस्त्याची जागा मूळ मालकाला परत देण्यासाठी शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालयाकडून आरेखन पूर्ण करण्यात आले. शनिवारी प्रांताधिकारी व महापालिका आयुक्त ही जमीन मूळ मालकाला परत करणार आहेत.
Regarding this road take route diversion as below :
Towards Maharastra : - via Old PB Road-CBS circle-RTO circle Kolhapur circle-KLE road
Towards Goa : - PB Road-CBS circle-RTO circle-Channamma circle- Gogte circle-Congress road
@COPBELAGAVI
बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुन्या पी.बी. रोडपर्यंत 600 मीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची योजना बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने आखली होती. पुढे भूसंपादन प्रक्रिया न राबविताच रस्ता करण्यात आला होता. त्यानंतर काही जमीनमालकांनी त्याला स्थगिती आणली. त्यामुळे, स्मार्ट सिटीने महापालिकेकडे ना हरकत मागितली होती. ती महापालिकेने दिल्यानंतर भरपाईसाठी काही जमीनमालक न्यायालयात गेले होते.bत्यामधील बी. टी. पाटील यांच्या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी द्विसदस्यीय खंडपीठाने स्मार्ट सिटी लिमिटेड व महापालिका अधिकाऱ्यांना फटकारुन जमीन सन्मानपूर्वक परत देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती.
बी. टी. पाटील यांची सुमारे 21 गुंठे जमीन रुंदीकरणात गेली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही जमीन मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरु झाली. बुधवारी (दि. 18) महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी व स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालिका आफ्रिन बानू बळ्ळारी यांच्यात झालेल्या बैठकीत रस्त्याचे सर्वेक्षण व आरेखन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडून गुरुवारपासून सर्वेक्षण व आरेखन सुरु केले होते. ही प्रक्रिया शुक्रवारी संपली.

Belgaum Widening of Old PB Road to Bank of India Road belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum Widening of Old PB Road to Bank of India Road

Widening of Old PB Road to Bank of India Road belgaum

बेळगाव : एसआयटी चौकशीची मागणी
जुना पीबी रोड ते बँक ऑफ इंडिया रस्ता रुंदीकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm