बेळगाव—belgavkar—belgaum : गुंडा कायद्याअंतर्गत पोलीस हिंदुत्ववाद्यांना अनावश्यक त्रास देत असल्याचा आरोप करत बजरंग दलाचे कार्यकर्ते शनिवारी रात्री शहापूर पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत होते.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
गुंडा कायद्याअंतर्गत शहापूर पोलिसांनी श्रीराम ____ आणि मनोज ____ या कार्यकर्त्यांना हद्दपार केल्याच्या विरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. गुंडा कायद्यांतर्गत बजरंग दलच्या दोन कार्यकर्त्यांना हद्दपार करत असल्याचा आरोप करत निदर्शने केली.
त्यांनी आरोप केला की बजरंग दलाचे कार्यकर्ते देशासाठी काम करत आहेत आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुंडा कायद्याअंतर्गत कोणतेही कारण नसताना खटले दाखल केले जात आहेत. त्यानंतर त्या दोघा कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली आहे.
तडीपार कारवाई न थांबल्यास राज्यात आंदोलन छेडण्याचा इशारा : पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेकीची घटना घडली होती. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई थांबली नाही तर संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्याचा इशारा कृष्णभट्ट यांनी दिला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
