बेळगाव—belgavkar—belgaum : लग्नाच्या एक दिवस आधी एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात घडली. येथील झुंजरवाड आरसी गावातील रहिवासी सदाशिव रामाप्पा होसाळकार (वय 31) याचा मृत्यू झाला.
या तरुणाचा विवाह 5 सप्टेंबर रोजी निश्चित झाला होता. कुटुंबातील सदस्य साफसफाईमध्ये सहभागी झाले होते. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरासमोर विवाहपूर्व तयारी सुरू होती. सदाशिव एका मित्रासोबत लग्नाच्या कामाबाबत फोनवर बोलत होता. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच कोसळला त्याला तात्काळ अथणी शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण, तेवढ्यात तरुणाचा जीव गेला होता. कुटुंबाचा आधार असलेला एकुलता एक मुलगा गमावल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना ऐगळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.