बेळगाव—belgavkar—belgaum : समिती नेते शुभम शेळके यांना पोलिसांनी राऊडी शिटर (rowdy sheeter) ठरविले आहे. शेळके यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात यापूर्वीच 12 गुन्हे दाखल झाले असल्याने राऊडी शिट उघडण्यात आली आहे. शेळके यांना सोमवारी अटक करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सांगितले.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
समिती कार्यकर्त्यांना पोलिसांकडून राऊडी शिटर ठरविले जात असल्याने सीमाभागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, या मागणीसाठी लढा देत आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून लढे देण्यात येत असले तरी पोलिसांकडून समिती नेते आणि कार्यकर्त्यांवर सुरुवातीपासूनच गुन्हे दाखल केले जात आहेत. याचा परिणाम सीमालढ्यावर होत आहे.
आता समितीचे युवा नेते शेळके यांनादेखील पोलिसांनी राऊडी शिटर ठरविले आहे. प्रक्षोभक प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा ठपका ठेऊन शुभम शेळके यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सोमवारी सायंकाळी त्यांना मिरज येथून अटक करण्यात आली. त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
जामीन अर्जावर सुनावणीशुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी सोमवारी अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश (DCP) यांच्या न्यायालयात होणार आहे. त्यामुळे शेळके यांना जामीन मिळावा यासाठी अॅड. महेश बिर्जे यांनी मंगळवारी पोलीस उपायुक्तांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
शुभम शेळके (राहणार अंजनेयनगर) यांच्याविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत एफआयआर दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी तीन दिवसांपासून धडपड सुरु केली होती. सोमवारी मिरज येथे अटक करून त्यांना बेळगावला आणण्यात आले. समिती नेते शुभम शेळके यांना पोलिसांनी राऊडी शिटर (rowdy sheeter) ठरविले आहे. शेळके यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात यापूर्वीच 12 गुन्हे दाखल झाले असल्याने राऊडी शिट उघडण्यात आली आहे.
समिती कार्यकर्त्यांना पोलिसांकडून राऊडी शिटर ठरविले जात असल्याने सीमाभागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, या मागणीसाठी लढा देत आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून लढे देण्यात येत असले तरी पोलिसांकडून समिती नेते आणि कार्यकर्त्यांवर सुरुवातीपासूनच गुन्हे दाखल केले जात आहेत. याचा परिणाम सीमालढ्यावर होत आहे. सोमवारी सायंकाळी त्यांना मिरज येथून अटक करण्यात आली. त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.
जामीन मिळालाशुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी सोमवारी अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश (DCP) यांच्या न्यायालयात झाली. शेळके यांना जामीन मिळावा यासाठी अॅड. महेश बिर्जे यांनी मंगळवारी पोलीस उपायुक्तांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बुधवारी शुभम शेळके यांना जामीन मंजूर केल्यामुळे सायंकाळी हिंडलगा कारागृहातून सुटका झाली आहे. यावेळी अनेक समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
