बेळगाव—belgavkar—belgaum : मोकाट कुत्र्यांनी अपार्टमेंटमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यात 2 सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले. इंद्रप्रस्थनगरमध्ये मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एक सुरक्षारक्षक जागीच बेशुद्ध पडला होता. नारायण पार्सेकर (वय 58, रा. आनंदनगर) आणि सूरज देसाई (52, रा. अनगोळ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
मंगळवारी पहाटे इंद्रप्रस्थनगरमधील एका अपार्टमेंटमध्ये मोकाट कुत्र्यांच्या कळपाने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्यांनी दोघा सुरक्षारक्षकांच्या पायांचा चावा घेतला. हा हल्ला इतका भयानक होता की एक सुरक्षारक्षक बेशुद्ध पडला. यामुळे झालेल्या मोठ्या गोंधळामुळे आजूबाजूच्या लोकांनी कुत्र्यांना पळवून लावले.
जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होत असतानाही महापालिका लक्ष देत नसल्याने इंद्रप्रस्थनगरमधील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
