बेळगाव लोकायुक्त पोलिसांकडे तक्रारबेळगाव सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षकबेळगाव—belgavkar—belgaum : उपनोंदणी खात्यात संघ नोंदणीसाठी 50 हजारांची लाच घेणारा अधीक्षक लोकायुक्त जाळ्यात सापडला. भरतेश शेबण्णावर असे त्याचे नाव आहे. सोमवारी सुरु झालेली ही कारवाई मंगळवारी पहाटेपर्यंत सुरु होती.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
याबाबत माहिती अशी, संकेश्वरमधील प्रशांत आत्माराम केळगडे यांनी युनायटेड सोशल अॅन्ड स्पोर्टस् क्लब नोंदणीसाठी नियमानुसार सहकार संघाच्या उपनोंदणी कार्यालयाकडे रितसर अर्ज केला होता. यावेळी शेबण्णावर याने वरिष्ठांचे नाव सांगत प्रशांत यांच्याकडे संघ नोंदणीसाठी 50000 रुपयांची लाच मागितली होती.
ते लाच देत नसल्याने तीन आठवड्यांपासून त्यांची फाईल मागे ठेवली होती. यामुळे प्रशांत यांनी याबाबत बेळगाव लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती. लोकायुक्त पोलिसांनी रचलेल्या सापळ्यानुसार प्रशांत 50000 रुपये घेऊन उपनोंदणी कार्यालयात गेले. यावेळी शेबण्णावरने आपल्या कारची चावी त्यांच्याकडे देत ही रक्कम आपल्या कारमध्ये ठेवण्याची सूचना केली.
लोकायुक्त पोलिसांना ही रक्कम कारमध्ये मिळाल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. ही चौकशी मंगळवारी पहाटेपर्यंत सुरु होती. लोकायुक्त पोलिस अधीक्षक हनुमंतराय, उपाधीक्षक बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी, त्यांचे सहकारी रवी मावरकर, राजू पाटील, मंजुनाथ कानपेठ, गिरीश पाटील, अभिजीत जमखंडी यांनी ही कारवाई केली.
