बेळगाव—belgavkar—belgaum : मच्छे येथे अपघातात जखमी झालेल्या इसमाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. गदगय्या पुजेरी (वय, 65. रा. प्रभूदेव गल्ली, प्रभूनगर खानापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास मच्छे येथील श्रीनिवास फॅक्टरी जवळील डिव्हायडरच्या बाजूला गदगय्या हे घराकडे परतण्याच्या तयारीत आपली दुचाकी घेऊन थांबले होते.
यावेळी बेळगावकडून मोटार घेऊन येणारे बसवराज हिरेमठ (रा. नेहरुनगर मच्छे) यांनी गदगय्या यांना धडक दिली. यात ते जखमी झाले असता त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी गदगय्या यांचा मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद आहे.
