बेळगाव—belgavkar—belgaum : चिक्कोडी तालुक्यातील बेलकुड गेटजवळ शुक्रवारी रात्री उशिरा बोलेरो पिकअप आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चारपैकी 2 प्रवासी जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. राकेश वाडेकर (25) आणि सौरभ (19) बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ शहर अशी मृतांची नावे आहेत.
आनंद घाटगे (19) आणि विकास बैरागी (19) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निपाणीहून मुधोळकडे जाणाऱ्या कारला पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. चिक्कोडी वाहतूक स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. याप्रकरणी चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.