Dog starts house fire by chewing portable phone battery : Video : अनेकजण कुत्रा-मांजर यांसारखे पाळीव प्राणी पाळतात. घरातील सदस्याप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात. लहान बाळाप्रमाणे पाळीव प्राण्यांवर देखील सतत लक्ष ठेवावे लागते. नजरे हटेपर्यंत हे पाळीव प्राणी घरात काही ना काही तोडफोड करतात किंवा काहीतरी सांडून ठेवतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका पाळीव श्वानाने घरात आग लावली आहे.
पाळीव श्वानाने पॉवर बँक चघळल्यामुळे घराला आग लागली आहे. घरात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली, त्यामुळे सत्य समोर आले... हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन श्वान आणि एक मांजर आपल्या घरात विश्रांती घेत असल्याचे दिसत आहे. एक श्वान लिथियम-आयन पॉवर बँक बॅटरी तोंडात पकडून पलंगावर विश्रांती घेत दिसतो. तिथे बसून तो बॅटरी चावण्याचा प्रयत्न करता दिसतो पण काही सेकंदात, बॅटरीचा स्फोट होतो आणि गादीला आग लागते. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे गोंधळलेले पाळीव प्राणी हे दृश्य असेच पाहत राहतात. नंतर येथून पळून जातात.
व्हिडिओ शेअर करताना एक्स युजरने लिहिले की, तुलसा, ओक्लाहोमा येथे श्वानाने पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी चघळल्यानंतर घराला आग लागली. तुलसा अग्निशमन विभागाने लोकांना “लिथियम-आयन बॅटरीच्या धोक्यांबद्दल” चेतावणी देण्यासाठी खालील व्हिडिओ जारी केला. मला आनंद आहे की प्राणी बिनधास्तपणे या परिस्थितीतून बाहेर पडू शकले. लिथियम बॅटरीमध्ये काही समस्या आहेत ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे, एकाने लिहिले. या घटनेनंतर, अग्निशमन विभागाने पाळीव प्राण्यांच्या मालकांना लिथियम-आयन बॅटरीच्या धोक्यांबद्दल आणि मुलांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवण्याचे महत्त्व याबद्दल सुरक्षितता चेतावणी दिली.