कोल्हापूरच्या स्वप्नीलनं इतिहास घडविला Paris Olympics 2024 : Swapnil Kusale is in action in Men's 50m Rifle 3-Positions Final

कोल्हापूरच्या स्वप्नीलनं इतिहास घडविला Paris Olympics 2024 : Swapnil Kusale is in action in Men's 50m Rifle 3-Positions Final

belgavkar.com | belgaum | belgavkar

Swapnil Kusale Wins Bronze Medal in 50m Rifle 3 Positions Men’s Final शेवटपर्यंत लढला अन् भारतासाठी घेऊन आला मेडल

paris-olympics-2024-swapnil-kusale-is-in-action-in-mens-50m-rifle-3-positions-final-202408.jpg | कोल्हापूरच्या स्वप्नीलनं इतिहास घडविला Paris Olympics 2024 : Swapnil Kusale is in action in Men's 50m Rifle 3-Positions Final | belgaum news | belgavkar बेळगावकर
Third Bronze for India : Swapnil Kusale secures bronze in 50m rifle 3 position at Paris Olympics 2024 : क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 3 पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सहाव्या दिवशी कोल्हापुरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसळे याने 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत भारताला आणखी एक मेडल जिंकून दिले आहे.
belgaum_belgavkar_gallery_belgav.jpg | कोल्हापूरच्या स्वप्नीलनं इतिहास घडविला Paris Olympics 2024 : Swapnil Kusale is in action in Men's 50m Rifle 3-Positions Final | belgaum news | belgavkar बेळगावकर
भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने (कांबळवाडी, ता. राधानगरी, कोल्हापूर) मंगळवारी झालेल्या क्वालिफायर फेरीत 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत एकूण 590 गुण मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्याने गुडघे 198, प्रोनमध्ये 197 आणि उभे राहून 195 गुण मिळवले. याच स्पर्धेत आणखी एका भारतीय ऐश्वर्या प्रताप सिंगची एकूण धावसंख्या 589 होती. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात दोन पदक आहे. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले. महिलांच्या या स्पर्धेत मनुने कांस्यपदक पटकावले. यानंतर मनुने सरबज्योत सिंगसोबत त्याच मिश्र स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकले.
महाराष्ट्राच्या राधानगरी (कोल्हापूर) येथे 6 ऑगस्ट 1995 साली जन्मलेला स्वप्नील कुसळे
ऑलिम्पिक मॅच पाहण्यासाठी बारावीच्या पेपरला दांडी : 2008 मध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला प्रेरणा मिळाली. ती मॅच पाहण्यासाठी त्याने 12 वीचा पेपरही बुडवला होता. 2009 मध्ये त्याच्या नेमबाजीच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्याचे वडील सुरेश यांनी याबाबत माहिती दिलीयं. जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक असलेले सुरेश कुसळे हे सांगतात, स्वप्नीलची मेहनत आणि त्याच्या चिकाटीचे हे फळ आहे. त्याने सरावासाठी कधी आळस केला नाही. एकवेळ तो जेवणार नाही, पण त्याने कधीच सराव थांबवला नाही. त्याची कोच (दिपाली देशपांडे) यांच्या प्रती असलेली श्रद्धा खूप आहे. तो त्यांना आईसमान मानतो... तो खूप भावनिक आहे आणि जी मुलं भावनिक असतात ती कधीच कुठे कमी पडत नाही.
प्राथमिक शिक्षक असलेल्या सुरेश कुसाळे यांनी स्वप्नीलच्या प्रवासाबाबत सांगितले. ते म्हणाले, सातव्या इयत्तेत असताना त्याची क्रीडा प्रबोधिनीला निवड झाली. आता आपण स्पर्धा परिक्षा पाहिलं तर लाखातून एखादा मुलगा यशस्वी होतो. यात आपला मुलगा टिकाव धरेल का? हा प्रश्न मला पडलेला आणि म्हणून मी त्याला वेगळा मार्ग दाखवला. आठवीत असताना त्याने रायफलची निवड केली आणि नाशिकच्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये त्याने प्रशिक्षण घेतले. सुरेश पुढे सांगतात, तो पहिली ते चौथी तो गावात शिकला आणि पाचवी ते सातवी तो कोल्हापूरच्या शाळेत शिकला. आठव्या इयत्तेत त्याची निवड झाल्यानंतर तो सांगलीत स्पोर्ट्स सेंट्रलपासून जवळ असलेल्या शाळेत गेला. नववीत असताना त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि त्याने रायफल उचलली. पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्याने 10 पैकी 9 शॉट्स अचूक मारले. तेव्हा त्याला बंदुक माहित नव्हती, त्यातली इतर माहिती तर सोडाच.
क्रीडा संकुलात जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं तेव्हा तिथल्या ऑफिसरने मेडिकल चेक अपच्या वेळी त्याला तू मुलगा आहेस की मुलगी असे विचारले. कारण तेव्हा तो गोरापान होता आणि शरीर एकदम कमकुवत होते त्यामुळे तेही कन्फ्युज झाले, असे वडील सांगतात. त्यांनी पुढे म्हटले, भोसला मिलिटरी शाळेत असताना त्याला मलेरिया झालेला आणि 4-5 दिवस सलग ताप होता. त्याच्यासोबतची मुलं त्याला डब्बा आणून द्यायची, पण त्याने आम्हाला काहीच कळू दिलं नाही. आम्हाला काहीतरी शंका आली आणि आम्ही तातडीने नाशिकला निघालो. भोगावती गावाजवळ त्याची तपासणी केली. तिथले डॉक्टर म्हणाले, आणखीन उशीर केला असता तर कठीण झालं असतं. तेव्हा त्याच्या शरीरात 54 हजार प्लेटलेट्स होत्या. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तो क्षण बाप म्हणून खूप कठीण होता. पण त्यातून बरं झाल्यानंतर त्याने मागं वळून पाहिले नाही.

कर्ज काढलं पण परदेशी धाडलं : पिस्तुल हा खर्चिक खेळ आहे आणि त्याचे दडपण वडिलांनी कधीच स्वप्नीलवर येऊ दिले नाही. ते सांगतात, 2012 मध्ये त्याची जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदा निवड झाली आणि तेव्हा मी दीड लाखाचं कर्ज घेऊन त्याला पाठवलं. त्या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पण, त्याने पुन्हा कसून सराव केला आणि 2015 मध्ये 18 पेक्षा कमी वय असताना केरळमध्ये खुल्या गटात रौप्यपदक जिंकले.

25 लाखांचं कर्ज... : नेमबाजी हा खेळ खूप खर्चिक आहे, पण याचा विचार आम्ही केला नाही. आतापर्यंत आम्ही 20 ते 25 लाखांपर्यंत कर्ज काढलं आणि ते आता फिटलंही आहे. जेव्हा तो रेल्वेत कामाला लागला तेव्हा खर्चाची जबाबदारी त्याने स्वतः घेतली, असे सुरेश यांनी सांगितले. स्वप्नील 2015 पासून भारतीय रेल्वेत मध्य रेल्वेच्या पुणे विभागात TTE म्हणून काम करतोय. वडील सांगतात, स्वप्निलच्या फायनलपूर्वी आम्ही ग्रामदेवतेला अभिषेक केला. त्याची आई गावची सरपंच आहे, तिने आणि सहकाऱ्यांनी फार कौतुकाने सारा विभाग स्वच्छ करून घेतला आहे. मला शंभर टक्के खात्री आहे तो पदक जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Paris Olympics 2024 : Swapnil Kusale is in action in Mens 50m Rifle 3 Positions Final

37 minutes ago

Times of IndiaLive

Paris Olympics 2024 : Swapnil Kusale Wins Bronze Medal in 50m Rifle 3 Positions Men’s Final

12 minutes ago

News18

Third Bronze for India : Swapnil Kusale secures bronze in 50m rifle 3 position at Paris Olympics

8 minutes ago

Business Today

कोल्हापूरच्या स्वप्नीलनं इतिहास घडविला Paris Olympics 2024 : Swapnil Kusale is in action in Men's 50m Rifle 3-Positions Final
Swapnil Kusale Wins Bronze Medal in 50m Rifle 3 Positions Men’s Final शेवटपर्यंत लढला अन् भारतासाठी घेऊन आला मेडल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm