
बेळगाव—belgavkar—belgaum : गोवा राज्यातून दारु आणून बेळगावात विकली जात असल्याची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी विशेष पथक तयार करून बेळगाव शहरात छापा टाकला. छाप्यात सुमारे 7 लाख 30 हजार किमतीची दारु जप्त करण्यात आली. 3 लाख किमतीचे बुलेरो पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे. एकूण ₹ 10 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी राकेश चौगुले (वय 31, रा. न्यू गुडशेड रोड, नर्तकी थेटरजवळ) याला खडेबाजार पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी अधिक तपास करत आहेत. गुडशेड रोड येथील संशयित आरोपीच्या घरासमोरील खूल्या जागेत लावलेल्या गाडीत 600 लिटर दारूचा साठा सापडला आहे.
