RSS worker Arvind Vaishya stabbed to death in Mumbai’s Dharavi; accused Niyaz, Arif arrested : दोन गटांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या धारावीतील 26 वर्षीय तरुणाची नुकतीच हत्या झाली. अरविंद वैश्य असे पीडितचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे बजरंग दल कार्यकर्ता अरविंद याच्या अंत्ययात्रेवरही दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ज्यात दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये अरविंद वैश्य यांची निर्घृण हत्या कशाप्रकारे करण्यात आली त्यावेळचे हे दृश्य आहे. पण खरंच हा व्हिडीओ अरविंद वैश्य याच्या हत्येचा आहे का? याचा आम्ही शोध घेतला असता एक वेगळीच बाजू समोर आली आहे. त्यामुळे या व्हिडीओबाबत व्हायरल होणारे दावे खरे आहे की खोटे हे जाणून घेऊया…
काय होत आहे व्हायरल? : X यूजर UPE0449 ने व्हिडीओ आपल्या प्रोफाईलवर शेअर केला. इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.
Please click here to Watch this Video or photo on X (twitter)
तपास : आम्ही व्हिडिओवरून मिळालेल्या कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला. आम्हाला काही बातम्यांच्या रिपोर्ट्समध्ये व्हायरल व्हिडिओमधले स्क्रीनग्रॅब्स आढळले. रिपोर्टमध्ये म्हंटले होते : आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील विनुकोंडा येथे एका व्यक्तीच्या निर्घृण हत्येने तेथील स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. रात्री मुख्य रस्त्यावर एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. व्यक्तीवर प्रथम क्रूर हल्ला करण्यात आला, यानंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. मुंडलामुरू बसस्थानकावर ही घटना उघडकीस आली, जिथे एका व्यक्तीने भर लोकांसमोर दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून या घृणास्पद गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगाराला पकडले. आम्हाला 18 जुलै 2024 रोजी अपलोड केलेली द हिंदू वर एक बातमी सापडली. इतर अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, पीडित महिला YSRC पक्षाची सदस्य होती, तर आरोपीचे नाव शेख जिलानी असे आहे, जो सत्ताधारी TDP चा कार्यकर्ता होता.
आम्हाला घटनेचे व्हिडिओ रिपोर्ट्स देखील सापडले. मुंबई पोलिसांनी एक्स वर केलेली एक पोस्ट सापडली. पोस्टमध्ये नमूद केले आहे की, व्हायरल व्हिडिओ मुंबई किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील नाही. निष्कर्ष : व्हायरल व्हिडिओ आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील विनुकोंडा शहरात रस्त्यावर एका व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा आहे. त्यामुळे मुंबईतील धारावीतील बजरंग दलाचा कार्यकर्ता अरविंद वैश्यच्या हत्येचा आणि या व्हिडीओचा काहीही संबंध नाही, हा व्हिडीओ अरविंद वैश्यच्या हत्येचा नाही. त्यामुळे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.