DJ Randall, jungle and drum & bass pioneer, has died : संगीतसृष्टीतून एक बातमी समोर आलीय. प्रसिद्ध डीजे स्टारचं निधन झालंय. हा डीजे स्टार दुसरा तिसरा कोणी नसून डीजे रँडल आहे. त्याच्या निधनानं संगीतसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. डीजे रँडलचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालंय. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
रॅंडल हा ड्रम आणि बास वाजवण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याला ब्रेकबीटचा गॉड फादरही म्हटलं जायचं. कमी वयातच त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्यानं संगीतसृष्टीचं मोठं नुकसान झालं असून मोठी पोकळी निर्माण झालीय. लोक सोशल मीडियावर डीजे रॅंडलला श्रद्धांजली वाहत आहे. डीजे रॅंडलचं निधन कशामुळे झालं हे अद्याप समोर आलेलं नाही.
दरम्यान, 1990 च्या दशकांत डीजे रॅंडलने फॅबिओ आणि ग्रूव्ह रायडरसारखी हीट गाणी बनवली. त्याच्या टॅलेंटच्या अनेक लोक प्रेमात होते. त्याचा चाहतावर्गही मोठा होता. तो स्वतःच्या स्टाइलने हटके गाणी बनवायचा. त्याची एक वेगळी स्टाइल असल्यामुळे लोक त्याच्या कामाच्या प्रेमात पडले.