बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव, उडुपी, बागलकोटसह कर्नाटक राज्यातील किनारपट्टी भाग आणि उत्तर भागात आगामी दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागात रेड अलर्ट जारी केले आहे. अरबी समुद्रातील वादळामुळे दक्षिण गुजरात ते केरळमधील किनारपट्टीवर जोरदार पाऊस होत आहे.
किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात वादळी पाऊस होत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. बुधवारपासून 2 ऑगस्टपर्यंत दक्षिण भाग आणि किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.