बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेला गांजा, चरस, अफिम आदी अमलीपदार्थ सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नावगे येथील कारखान्यात नष्ट करण्यात आले. यावेळी पर्यावरणाला धोका पोहोचू नये, याची दक्षता घेण्यात आली होती. पोलीस व अबकारी खात्याकडून विविध गुन्हेगारी प्रकरणात जप्त करण्यात येणारे अमलीपदार्थ जिल्हा ड्रग डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत नष्ट करण्यात येतात.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
यावेळी नावगे येथील केमिकल्स कारखान्यात बेळगाव, चिकोडी, बागलकोट, विजापूर येथील अबकारी विभागाने जप्त केलेले अमलीपदार्थ नष्ट करण्यात आले. अबकारी विभागाचे सहआयुक्त एच. एफ. चलवादी यांच्या नेतृत्वाखाली विजापूरचे अबकारी उपायुक्त मुरलीधर, चिकोडीचे अबकारी उपायुक्त स्वप्ना, बागलकोटचे उपायुक्त हणमंतप्पा बजंत्री व बेळगावचे विजयकुमार हिरेमठ आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ नष्ट करण्यात आले.
बेळगाव उत्तर जिल्हा व चिकोडी विभागाने जप्त केलेला 421 किलो 168 ग्रॅम गांजा, 1 किलो 915 ग्रॅम चरस, बागलकोट जिल्ह्यात जप्त करण्यात आलेला 78 किलो गांजा व विजापूर जिल्ह्यात जप्त करण्यात आलेले 90 किलो 44 ग्रॅम अफिम, 106 किलो 732 ग्रॅम गांजा, 4 पाॅपी सिड्स नष्ट करण्यात आल्याचे अबकारी विभागाने सांगितले
