बेळगाव—belgavkar—belgaum : @महाराष्ट्र : मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार वचनबद्ध असून सीमाभागात शिक्षण आणि आरोग्यासह विविध कल्याणकारी योजना सरकारकडून राबविण्यात येत आहे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या अभिभाषणातून सांगितले.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-आंबेडकर-फुले, अहिल्याबाई होळकर अशा व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणेने राज्य सरकारचे कामकाज सुरु असल्याचे नमूद केले. त्यानंतर सीमाप्रश्नाचा उल्लेख करताना तो सोडवण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असल्याचे सांगितले. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून, तो सुटेपर्यंत महाराष्ट्र सरकारने सीमावासीयांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक सवलती देऊ केल्या आहेत. त्याबाबत बोलताना राज्यपलांनी सीमाभागात महाराष्ट्राने कल्याणकारी योजना सुरु केल्याचे सांगितले.
