बेळगाव : एचएसआरपी नंबर प्लेट वाहनांवर बसवण्यास मुदतवाढ @कर्नाटक

बेळगाव : एचएसआरपी नंबर प्लेट वाहनांवर बसवण्यास मुदतवाढ @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

HSRP mandatory in Karnataka | Deadline extended

high-security registration plates (HSRP)

बेळगाव—belgavkar : एचएसआरपी नंबर प्लेट वाहनांवर बसवण्यास मुदतवाढ करण्यात येणार असून त्याचबरोबर 4 जुलैपर्यंत कोणत्याही वाहनांवर कारवाई करण्यात येणार नाही, अशी माहिती कर्नाटक राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्याची शक्यता आहे. एचएसआरपी प्लेट बसवण्याची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढविण्यात येईल. याबाबत अधिकृत आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. याबाबत अधिकृत आदेश आठवडाभरात बजावण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठासमोर सदर माहिती देण्यात आली. मुख्य न्यायाधीश एन. व्ही.अंजारिया, न्यायाधीश के. व्ही. अरविंद यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारच्या निर्णयाविरोधात एचएसआरपी मॅन्युफॅक्चर संघटनेतर्फे न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. न्यायालयाने सरकारला एचएसआरपी प्लेटसाठी मुदतवाढ करण्याची नोटीस बजावण्याला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर 4 जुलैपर्यंत कोणत्याही वाहनांवर कारवाई करण्यात येऊ नये, असे बजावले आहे.
राज्य सरकारला मुदतवाढ करण्याची नोटीस बजावण्याबाबत न्यायालयाने स्वातंत्र्य दिले आहे. आठवडाभरात निर्णय घेण्याचे सूचित केले आहे. 31 मेरोजी एचएसआरपीची मुदत संपली होती. परंतु हा मुद्दा न्यायायलात असल्याने सरकारने कोणत्याही कारवाईचा आदेश बजावला नव्हता.

Belgaum HSRP Number Plate deadline : HSRP Mandatory Deadline Postponed belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Karnataka HSRP Deadline Extended belgavkar

HSRP mandatory in Karnataka | Deadline extended belgaum

बेळगाव : एचएसआरपी नंबर प्लेट वाहनांवर बसवण्यास मुदतवाढ @कर्नाटक
HSRP mandatory in Karnataka | Deadline extended

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm