येडियुरप्पांना दिलासा @कर्नाटक

येडियुरप्पांना दिलासा @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

POCSO अंतर्गत होणारी अटक तुर्तास टळली;
हायकोर्टानं काय म्हटलंय वाचा?

Karnataka HC directs CID to not arrest ex-CM Yediyurappa in POCSO case

कर्नाटकचे : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी गुरुवारी विशेष कोर्टानं अजामिनपात्र अटक वॉरंट काढलं होतं. त्यामुळं येडियुरप्पांच्या अडचणी वाढल्या होत्या. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण या आदेशाविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टानं त्यांना दिलासा दिला आणि पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई करु नये असे निर्देश पोलिसांना दिले.
कर्नाटक हायकोर्टानं निरीक्षण नोंदवताना म्हटलं की, येडियुरप्पा हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत जे त्यांच्या आयुष्याच्या उतरंडीला आले आहेत आणि सध्या आजारी देखील आहेत. पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात येऊ नये. याच वर्षी मार्चमध्ये येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. हा खटला रद्द करावा यासाठी येडियुरप्पा यांनी बुधवारी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. विशेष कोर्टानं गुरुवारी येडियुरप्पा यांच्यासाठी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.
कर्नाटक : पोक्सो कायद्यान्वये नोंदविलेल्या एका गुन्ह्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना बंगळुरू न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. 17 वर्षे वयाच्या मुलीचा येडीयुरप्पा यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार तिच्या आईने केली होती. त्या प्रकरणी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) येडीयुरप्पांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. 
या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे अशी नोटीस गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बी. एस. येडीयुरप्पा यांना बजावली आहे. आवश्यकता वाटल्यास त्यांना अटकही करण्यात येईल असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी गुरुवारी सांगितले. या प्रकरणी शनिवारी, 15 जून रोजी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी येडीयुरप्पा यांचा जबाब नोंदविणे आवश्यक आहे. 
भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य असलेले बी. एस. येडीयुरप्पा सध्या दिल्लीत आहेत. ते तिथून बंगळुरूला आल्यानंतर चौकशीला सामोरे जातील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

Karnataka High Court stays BS Yediyurappas arrest in POCSO case

56 minutes ago

Hindustan Times

Karnataka HC directs CID to not arrest ex CM Yediyurappa in POCSO case till June 17

51 minutes ago

The Indian Express

Non bailable warrant issued against former CM Yediyurappa in POCSO case

24 hours ago

The News Minute

येडियुरप्पांना दिलासा @कर्नाटक
POCSO अंतर्गत होणारी अटक तुर्तास टळली; हायकोर्टानं काय म्हटलंय वाचा?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm