बेळगाव—belgavkar—belgaum : ई-आस्थी प्रणालीत ए आणि बी खात्यात मिळकतींची नोंद करून घेण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे शहरातील 58 प्रभागांमधील मिळकतींची नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी महापालिकेच्या महसूल विभागाकडून कुमार गंधर्व रंगमंदिर येथे सर्व प्रभागांसाठी स्वतंत्र कॉम्प्युटर व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच त्याच ठिकाणी चलन भरण्याची व्यवस्था देखील करून देण्यात आली असून बँकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
Siddaramaiah sets three-month deadline for officials to issue B-khata for properties in unauthorised layouts | B-khata to properties in unauthorised layoutsत्यामुळे ए आणि बी खात्यांतर्गत मिळकतींची नोंदणी करून घेण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.महापालिकेच्या महसूल विभागाकडून कुमार गंधर्व रंगमंदिर येथे ए आणि बी मिळकतींची नोंद करून घेण्यासाठी सोय करून देण्यात आली आहे.
याची महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते फित कापून सुरुवात करण्यात आली. महापालिकेत मिळकतधारकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी महसूल विभागाकडून नजीकच्या कुमार गंधर्व रंगमंदिरात सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 40 कॉम्प्युटर आणि डेटा एंट्री ऑपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. एका कॉम्प्युटर चालकाकडे प्रत्येकी 3 प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
तीन महिन्यांच्या काळात ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मिळकतधारकांनी आपल्या मिळकतींची नोंद करून घेण्यासाठी महापालिकेत जाण्याची गरज नसून नजीकच्या कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जावे, असे आवाहन केले आहे. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. मिळकतींची नोंद करून घेताना बँकेत जाऊन चलन भरावे लागते. मात्र, यासाठी लोकांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी त्याच ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था केली आहे.
