बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर येथील बस आगारात बसमधील एका महिलेच्या पर्समधील आठ तोळे सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरट्याने लांबविल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
याबाबत माहिती अशी की, ओलमणी येथील रहिवासी प्रज्ञा चव्हाण या आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी मुतगा येथे गेल्या होत्या. लग्न आणि पूजा आटोपून रविवारी त्या आपल्या गावी ओलमणी येथे येण्यासाठी बेळगावहून खानापूरला आल्या. बस आगारात जांबोटी बस लागलेली असल्याने त्या जांबोटी बसमध्ये चढल्या. तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड दाखविण्यासाठी पर्समध्ये हात घालताना पर्समधील सोन्याचा बॉक्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली.
लागलीच वाहकाने याची माहिती आगारप्रमुखांना दिली. आगारप्रमुखाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
@ खानापूर शहर परिसर आणि बसस्थानकात वारंवार होत असलेल्या चोरीमुळे महिला प्रवाशात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभारले जात आहे.शुक्रवारी सन्नहोसूर येथील सविता पाटील व हाजगोळी येथील महिलेचे आणि रविवारी प्रज्ञा चव्हाण यांचे साडेआठ तोळे सोने असे एकूण 22 तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले आहे. आता पोलिसांनी चोरट्यांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.![]()
Browser Setting
belgaum news 22 tolas of gold ornaments stolen Khanapur
belgaum Khanapur robbery news belagaviबेळगाव : 22 तोळे सोन्याचे दागिने लांबविले
खानापूर बस आगारातील तिसरी घटना
Support belgavkar