बेळगाव : घरपट्टी भरण्यासाठी % टक्के सवलती

बेळगाव : घरपट्टी भरण्यासाठी % टक्के सवलती

belgavkar.com | belgaum | belgavkar

Corporation to offer 5% Rebate on Property tax

बेळगाव—belgavkar : बेळगाव शहरातील मालमत्ताधारकांना सरकारने पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला असून घरपट्टी भरणाऱ्यांना दि. 31 जुलै 2024 पर्यंत 5 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याने त्याचे स्वागत होत आहे. याबाबत सरकारकडून तशा आदेशाचे पत्र महानगरपालिकेला आले आहे.
एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना दरवर्षी 5 टक्के सवलत दिली जाते. यावर्षीही ही सवलत लागू होती. मात्र चलन वेळेत मिळत नव्हते. याचबरोबर ऑनलाईन समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्या सवलतीचा काही दिवसच लाभ मिळाला. शहरातील नागरिकांनी आणखी एक महिना सवलत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. त्याबाबत महानगरपालिकेनेही बेंगळूरच्या नगरविकास खात्याकडे तो प्रस्ताव पाठविला होता. सरकारने याबाबत लवकर निर्णय घेतला नाही. त्यामुळे मे पासून विनासवलत अनेकांनी घरपट्टी भरली. मात्र जून महिन्यात पुन्हा 5 टक्के सवलतीचा आदेश आल्याने साऱ्यांनाच दिलासा मिळाला. 31 जुलैपर्यंत 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे.
सवलत मिळेल या आशेने अनेकांनी घरपट्टी भरली नाही. मात्र आता सरकारने आदेश दिल्यामुळे घरपट्टीमध्ये 5 टक्के कपात होणार आहे. महानगरपालिकेतर्फे पहिल्या महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या करदात्यांना पाच टक्के सवलत दिली जाते. त्याचा लाभ घेण्यासाठी बरेच जण धडपडतात. यावर्षी देखील त्या सवलतीत घरपट्टी भरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र चलन वेळेत मिळत नव्हते. याचबरोबर ऑनलाईन कर भरताना सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी सकाळीच रांगेत उभे रहावे लागत होते. या समस्येमुळे या सवलतीपासून अनेकजण वंचित राहिले होते. आता पुन्हा सवलतीमध्ये वाढ केल्याने त्याचा फायदा साऱ्यांनाच होणार आहे.

Belgaum 5 percent discount on mortgage payments belgavkar बेळगाव rebate on property tax belgaum

Belgaum rebate on property tax

rebate on property tax belgavkar belgaum

बेळगाव : घरपट्टी भरण्यासाठी % टक्के सवलती
Corporation to offer 5% Rebate on Property tax

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm