बेळगाव—belgavkar—belgaum : तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे. उल्हास गुरुराज शेट (45, रा. मंगाईनगर, तिसरा क्रॉस, वडगाव) असे मृताचे नाव आहे. उल्हास याची लहानपणापासूनच मानसिक स्थिती बिघडलेली होती.
गुरुवारी रात्री 10.30 ते शनिवारी दुपारी दोन या दरम्यान ते मंगाईनगरमध्ये असलेल्या तलावाजवळ ते गेले असावेत. या ठिकाणी बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांच्या भावाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.