काय सांगता...! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान

काय सांगता...!
एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान

belgavkar.com | belgaum | belgavkar

व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

video of voting for BJP candidate 8 times goes viral

ईव्हीएमबाबत विरोधकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एकच तरुण आठवेळा मतदान करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
अखिलेश यादव यांनी व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलाय की, एकच व्यक्ती आठवेळा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर गेला अन् त्याने आठवेळा मतदान केलं. पोस्टमध्ये अखिलेश यादव म्हणालेत की, 'निवडणूक आयोगाला हे चुकीचं वाटत असेल तर ते कारवाई करतील. नाही तर...! भाजपची बूथ कमेटी ही लूट कमेटी आहे.'
राहुल गांधी यांनी अखिलेश यादव यांची पोस्ट रिट्विट केली आहे. यात ते म्हणालेत की, 'आपला पराभव दिसत असल्याने भाजप सरकारी यंत्रणांवर दबाव टाकून लोकशाहीला लुटू पाहात आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावाला बळी न पडता संवैधानिक जबाबदारीचं भान ठेवेल अशी अपेक्षा काँग्रेस करतं. नाहीतर इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर संविधानाच्या शपथेचा अपमान करणाऱ्यावर अशी कारवाई केली जाईल की तो पुन्हा दहा वेळा विचार करेल.'
अखिलेश यांनी 17 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला असला तरी सोशल मीडियावर पूर्ण व्हिडिओ व्हायरल होत आहे. पूर्ण व्हिडिओ 2 मिनिट 19 सेकंदाचा आहे. व्हिडिओत दिसतंय की, एक तरुण वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन आठवेळा मतदान करतो. मतदान केल्यानंतर तो कितीवेळा मतदान केलं हे देखील सांगतो. आपण कोणाच्या नावाने मतदान टाकायला जातोय हे देखील तरुण व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. दरम्यान, व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी आम्ही करत नाही. व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

UP man video of voting for BJP candidate 8 times goes viral

12 hours ago

India Today

1 7 yr old seen voting for BJP 8 times in video detained

6 hours ago

Times of India

FIR lodged after video of youth voting 8 times for BJP

काय सांगता...! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान
व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm