राहुल गांधींचा ‘तो’ VIDEO मॉर्फ? Fact Check : Video

राहुल गांधींचा ‘तो’ VIDEO मॉर्फ?
Fact Check : Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

काँग्रेसने Video शेअर करत केली पोलखोल

लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे पूर्ण झाले असून अजून 3 टप्पे बाकी आहेत. या तीन टप्प्यांच्या प्रचारात आता विरोधी आणि सत्ताधारी एकमेकांवर आगपाखड करत आहेत. पाचव्या टप्प्यातील मतदानाला वेग आला असून आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यातच, भाजपाने राहुल गांधींचा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. 4 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान राहतील, असं राहुल गांधी म्हणत असल्याच दावा भाजपाने केलाय. परंतु, हा व्हिडिओ खोटा असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.
2024,4 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान राहतील, असं राहुल गांधी म्हणाले असल्याचा व्हिडिओ भाजपाने प्रसिद्ध केला आहे. परंतु, काँग्रेसने हा दावा फेटाळून लावला. हा व्हिडिओ खोटा असून काँग्रेसने खरा व्हिडिओ शेअर केलाय. त्यात राहुल गांधी 2024,4 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत, असं म्हटल्याचं ऐकू येतंय. बुडत चाललेल्या भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या फेक न्यूज फॅक्टरीला आता फेक व्हिडिओचा आधार आहे. सवयीने राहुल गांधींचे भाषण एडीट करून खोटा व्हिडिओ बनवला गेला आहे आणि त्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडले गेले, अशी पोस्ट काँग्रेसने केली.

काँग्रेसची हीच पोस्ट रिशेअर करत राहुल गांधी म्हणाले, “खोट्याची फॅक्टरी अलेल्या भाजपाने स्वतःला कितीही दिलासा देण्याचा प्रयत्न केला तरीही काही फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, 4 जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात इंडिया आघाडीची चर्चा आहे.”
इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण? : दरम्यान, एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर आहे. परंतु, इंडिया आघाडीने अद्यापही पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीवर यामुळे टीका केली जातेय. इंडिया आघाडीकडून राहुल गांधींच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही. तसंच, मल्लिकार्जुन खरगे यांचंही नाव चर्चेत असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे निकाल लागल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

Fact Check : Rahul didnt assure crowds in UP that Modi will return as PM

edited video of Rahul Gandhi is shared as PM

Modi will return as PM

राहुल गांधींचा ‘तो’ VIDEO मॉर्फ? Fact Check : Video
काँग्रेसने Video शेअर करत केली पोलखोल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm