बेळगाव—belgavkar—belgaum : येळळूर ग्राम पंचायतीच्या सदस्या व येळळूर विभाग भाजपाच्या सक्रिय सदस्या राजकुंवर पावले यांची बेळगाव दक्षिण भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ, कोर कमिटी सदस्य, जिल्हा महानगर अध्यक्षा गीता सुतार, राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके व आमदार अभय पाटील यांच्या सुचनेवरुन ही निवड करण्यात आली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
पावले 2008 पासून भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. येळळूरसह दक्षिण मतदारसंघात भाजप वाढीसाठी त्यांनी कार्य केले आहे. गेल्या 20 वर्षापासून त्या ग्राम पंचायत सदस्या आहेत. त्या उच्च विद्याविभूषित असून मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
