Karnataka suspends peanut 'chikki' distribution in schools over health concerns‘chikki’ (candy made of peanut with jaggery or sugar)बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटक राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह आहार योजनेंतर्गत पौष्टिक आहार मिळावा यासाठी अंडी, केळी व चिक्की वितरित करण्यात येत होती. मात्र कालबाह्य (expired) चिक्कीचे वितरण काही शाळांमध्ये होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर धारवाड शिक्षण विभागाने चिक्कीचे वितरण थांबवून फक्त अंडी किंवा केळी वाटप करण्याचा आदेश सोमवार दि. 17 रोजी दिला आहे (excess unsaturated fats and high sugar content in chikki).
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यादृष्टीने 2022-23 मध्ये पंतप्रधान पोषण शक्ती योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 46 दिवसांसाठी माध्यान्ह आहारातून अंडी, केळी व चिक्कीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर 2023 च्या अर्थसंकल्पात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 80 दिवसांसाठी पौष्टिक आहार वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती. या अर्थसंकल्पात एका विद्यार्थ्याला 6 रुपये खर्च करावेत. यातून अंडी, शेंगदाणा चिक्की आणि केळी वितरित करण्याचे आदेश दिले होते.
अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या सहाय्याने सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातील दोन दिवस पौष्टिक आहार दिला जात होता. त्यानंतर यात वाढ करुन आठवड्यातील चार दिवस याचे वितरण करण्यात येत होते. मात्र, नव्या आदेशाप्रमाणे आता फक्त अंडी किंवा केळीचे वितरण करण्यात येणार आहे.
शिक्षण खात्याच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना दिली जाणारी चिक्की आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामध्ये जास्त प्रमाणात साखर असल्याने तसेच योग्य प्रमाणात साठा करण्यात नसल्याचा अहवाल शिक्षण खात्याकडे आला होता. त्याचबरोबर धारवाड शैक्षणिक जिल्ह्यात अनेक शाळांत कालबाह्य चिक्की विद्यार्थ्यांना दिली जात होती. त्यामुळे चिक्कीचे वितरण थांबून फक्त अंडी किंवा केळी वाटप करण्याचा आदेश धारवाड शिक्षण विभागाने दिला आहे (improper storage and instances of expired chikkis being distributed, further raising alarms about potential health risks).
केळ्यांचे वितरण वाढणारअनेक शाळांमध्ये अंडी व केळीचे वितरण केले जाते. मात्र, काही शाळांतील विद्यार्थी केळ्यांना पसंती देत असतात. अंडी खाण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी आहे. त्यामुळे केळ्यांचे वितरण वाढण्याची शक्यता आहे.
