बेळगाव—belgavkar : चन्नम्मा सर्कलकडून रामदेव हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस चौकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने चौकी जमीनदोस्त झाली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून या अपघातानंतर काहीवेळ वाहतूक कोलमडली. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ होत चालली असल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य बनल्या आहेत.
मात्र, वाहतूक पोलिसांना रस्त्यावर थांबून वाहतूक नियमन करावे लागत आहे. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चौकींचा आसरा महत्त्वाचा बनला आहे. सुदैवाने या चौकीत कोणी नसल्यामुळे दुर्घटना टळली.