मतदानानंतर हैदराबादला जाणाऱ्या बसला आग, 6 जणांचा मृत्यू, बस जळून खाक

मतदानानंतर हैदराबादला जाणाऱ्या बसला आग, 6 जणांचा मृत्यू, बस जळून खाक

belgavkar.com | belgaum | belgavkar

Bapatla-Hyderabad Bus Catches Fire in Palnadu

bus accident in Palnadu district

तेलंगणा : बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादला जाणाऱ्या बसची चिल्कलुरीपेटच्या वरिपलेम डोणका येथे हायवाला धडक होऊन बस आणि हायवाला आग लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाला. जखमींना पुढील उपचारासाठी गुंटूर येथे हलविण्यात आले. चिलकलुरीपेटा ग्रामीण पोलीस स्टेशनने याबाबत माहिती दिली आहे. 
जखमींवर चिलाकालुरीपेट शहरातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गुंटूरला रेफर करण्यात आले. अंजी (35), उपगुंडुर काशी (65), उपगुंडूर लक्ष्मी (55) आणि मुप्पाराजू ख्याती सैश्री (8, सर्व रा. बापटला, आंध्र प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अन्य दोन मृतांची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जखमी लोकांनी सांगितले की सोमवारी मतदान केल्यानंतर एकूण 42 लोक बसमध्ये प्रवास करत होते. त्यापैकी एक हायवा ड्रायव्हर, एक बस ड्रायव्हर आणि इतर चार जण जागीच मरण पावले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पालनाडू जिल्ह्यातील चिलाकालुरीपेट मंडल येथे हा अपघात झाला. बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम या मंडळातून बस हैदराबादला जात असताना हायवला (Lorry) धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले.

Bapatla Hyderabad Bus Catches Fire in Palnadu

6 killed as bus and lorry catch fire after collision in Telangana

51 minutes ago

India Today

6 charred to death in bus accident in Palnadu district

27 minutes ago

The Hindu

मतदानानंतर हैदराबादला जाणाऱ्या बसला आग, 6 जणांचा मृत्यू, बस जळून खाक
Bapatla-Hyderabad Bus Catches Fire in Palnadu

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm