सांगली (महाराष्ट्र) : (कर्नाटक) बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचणी / चिंचली येथे माघी पौर्णिमेला मायाक्का देवीच्या यात्रेला अनेक भाविक गेले होते. यात्रा संपल्यावर घरी परत येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुण रस्त्याने हुल्लडबाजी करत येत होते. सांगलवाडीतील या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यामध्ये 35 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर काहीं तरुणांनी गाड्या रस्त्यावर टाकून पळ काढला आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code

मायाक्का देवी ही मातृशक्तीचे एक रूप असून तिची पूजा प्रामुख्याने उत्तर कर्नाटकात आणि दक्षिण महाराष्ट्रात केली जाते. ही यात्रा संपल्यानंतर बाईकवरून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिलाय. बेळगावातील चिंचणी येथे माघी पौर्णिमेला दरवर्षी मायाक्का देवीची यात्रा भारत असते. या यात्रेला बैलगाडीतून किंवा घोडागाडीतून शेकडो भावी परंपरेप्रमाणे जात असतात. तर अनेकजण आपापल्या पद्धतीने दुचाकी किंवा गाडीने जात असतात. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील अनेकजण यात्रेला जात असतात. नुकतीचं हि यात्रा पार पडली असून भाविक यात्रेला जाऊन परतत आहेत.
मायाक्का देवीची यात्रा संपल्यावर भाविक घरी परतत असतात. याचवेळी घोडागाड्या पळवत असताना त्यासोबत दुचाकी असतात. असे प्रत्येक वर्षी असते. मात्र रविवारी रात्री दोन हजाराहून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून सांगलीकडे परत येत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत हुल्लडबाजी करत घराकडे येत होते. सांगलीच्या हार्बर रोड टिळक चौकात अडवून त्यांना रट्टा दिला. तर यावेळी काही तरुणांनी गाड्या टाकून पळ काढला.
जोरजोरात आवाज करत दुचाकीने जाणाऱ्या तरुणांच्या हुल्लडबाजीने नागरिक घाबरून जागे झाले होते. तर याबाबत पोलिसांना देखील माहिती मिळाली होती. दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चाप लावण्यासाठी सांगलीच्या हार्बर रोड टिळक चौकात अडवून चांगलाच चोप दिला. तर यावेळी काही तरुणांनी गाड्या टाकून पळ काढला.
प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरामायाक्का देवी कर्नाटक-महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध शक्ती, आणि नवसाला पावणारी देवी आहे. मायाक्का देवीची यात्रा महिनाभर यात्रा चालते. प्रत्येक वर्षी ही यात्रा भारत पौर्णिमेच्या दिवशी सुरुवात होते. यात्रेच्या चौथ्या दिवशी श्री मायाक्का देवीची पालकी मिरवणूक कार्यक्रम होत असतो. ही यात्रा प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. कर्नाटकासह महाराष्ट्रातील लाखो भक्त श्री मायाक्का दर्शनासाठी यात्रेच्या काळात येतात. महाराष्ट्रातील, कोकण भागासह, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, भीड यासह कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा या जिल्ह्यातील भाविक प्रत्येक वर्षी यात्रा काळात स्वच्छ भावनेने चिंचली येथे श्री मायाक्का दर्शनासाठी येतात.गेल्या 20 वर्षांपासून घोडा गाडी पळविण्याची प्रथा...चिंचली ते सांगलीवाडी 65 किलोमीटरचे अंतर आहे. यात्रा संपल्यानंतर म्हैसाळ येथे सर्व घोडागाड्या एकत्र येतात, तेथून निघाले की सांगलीवाडीत येऊन गाड्या थांबतात. गेल्या 20 वर्षांपासून यात्रा संपल्यानंतर घोडागाडी पळविण्याची प्रथा आहे. दोन वर्षापूर्वी कर्नाटक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर गतवर्षी रात्री आठ, नऊच्या सुमारास गाड्या सांगलीवाडीत आल्या होत्या. यंदा मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्याने पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.
