सध्या देशभरामध्ये याच प्रकरणाची चर्चा आहे. फोटोत दिसणारे पोलीस कर्मचारी पेट्यांमध्ये भरलेला हा ऐवज गाड्यांमध्ये ठेवताना दिसत आहेत. नेमकं घडलंय काय आणि कोण आहे ही महिला जाणून घ्या सविस्तर वृत्त...Gold crown, gold sword : Jayalalithaa's seized assets transferred to Tamil Naduमिळकतीपेक्षा अधिक संपत्ती प्रकरणामध्ये तामिळनाडूमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई एका माजी मुख्यमंत्र्यासंदर्भात करण्यात आली असून अनेक किलो सोनं आता थेट राज्य सरकारच्या ताब्यात आलं आहे. (कर्नाटक) बंगळुरुमधील कोर्टाने आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Tamil Nadu govt takes possession of Jayalalithaa's seized assets, including 27 kg gold and 1,116 kg silverसदर प्रकरण हे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यासंबंधित आहे. (कर्नाटक) बंगळुरु कोर्टाने या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना वादात असलेलं सर्व सोनं तामिळनाडू सरकारच्या ताब्यात दिलं जावं असे आदेश दिले आहेत. यानंतर सरकारने ताब्यात घेण्यात आलेल्या आणि एकेकाळी जयललितांकडे असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे सोन्याची तलवार आणि सोन्याच्या मुकुटाचाही समावेश आहे. कर्नाटक सरकारने हा ऐवज तामिळनाडू सकारकडे सोपवला आहे.
तामिळनाडू सरकारकडे सोपवण्यात आलेल्या ऐवजामध्ये हिऱ्याचं काम असलेल्या मोरांचं डिझाइन असणारं मुकूटही आहे. कर्नाटक सरकारने आतापर्यंत या प्रकरणामध्ये 27 किलो 558 ग्राम सोनं ताब्यात घेतलं आहे. तसेच 1116 किलो चांदी आणि 1526 एकर जमिनीची कागदपत्रं ताब्यात घेतली. हे सर्व साहित्य कर्नाटकमधील विधानसौध येथील कोषागरामध्ये ठेवण्यात आलं आहे. या सोन्याच्या ऐवजामध्ये काही सोन्याच्या मुकुटांचाही समावेश आहे. या सोन्याच्या ऐवजाचे काही फोटो व्हायरल झाले असून ते चांगलेच चर्चेत आहेत. अन्य एक ऐवज हा चक्क जयललिता यांची सोन्याची छोटी प्रतिकृती आहे.
एका हिऱ्याच्या हाराचाही समावेश तामिळनाडू सरकारकडे सोपवण्यात आलेल्या या ऐवजामध्ये आहे. काही सजावटीच्या सोन्याच्या प्लेट्सही या ऐवजामध्ये असून त्यावर जयललितांची नमस्कार करतानाची प्रतिमा आहे. सोन्याच्या लहानमोठ्या बऱ्याच गोष्टी या ऐवजामध्ये आहेत. हिरेजडीत गोल्डन ब्रेस्टलेट्सही या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत आहेत. सोन्याच्या एकूण 481 वस्तू यामध्ये आहेत. जयललिता यांचा 2016 साली मृत्यू झाला. जयललितांना मिळालेलं हे सोनं मागील 21 वर्षांपासून कर्नाटक सरकारच्या तिजोरित होतं.
