आंध्र प्रदेशमधील अनंतपुर येथील एका केंद्रीय विद्यापीठात तुफान राडा झाला आहे. central university in Andhra Pradesh’s Anantapur येथील विद्यार्थ्यांचा एक गट थेट महिलांच्या प्रसाधनगृहांमध्ये शिरल्याने वाद निर्माण झाला. विद्यापीठातील महिलांच्या प्रसाधनगृहामध्ये मुलांना शिरताना पाहून सर्वच विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरु केला. रात्री उशीरा झालेल्या या रड्यादरम्यान विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन घडलेल्या प्रकरणाला विरोध करण्यासाठी आंदोलन केलं.
नेमकं घडलं काय? : सदर घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. मुलांचा एक गट अचानक महिलांचा टॉयलेटमध्ये शिरला. यामुळे सर्वच मुली आणि महिला घाबरल्या. विद्यार्थिनींनी तातडीने पोलिसांना आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. मात्र त्यांना समोरुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेनंतर विद्यापीठाच्या आवारामध्ये पुरेशी सुरक्षा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. घोषणाबाजी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी रास्ता रोको करत पोलिसांनी आमच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी आणि तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन या विद्यार्थ्यांना हवं होतं. तसेच यापुढे विद्यापीठीच्या आवारात पुरेशी सुरक्षा पुरवली जाईल अशी मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांना शंका : 'आमचा पोलीस आणि विद्यापीठाच्या प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. आम्ही आमच्या स्वतः च्या सुरक्षेसाठी लढा सुरु ठेऊ. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. मात्र या प्रकरणात कठोर कारवाई होईल की नाही याबद्दल विद्यार्थ्यांना शंका आहे,' असं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांपैकी एकाने 'आज तक'शी बोलताना सांगितलं. मात्र अशाप्रकारे घडलेला हा काही पहिला प्रसंग नाही.
विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका : सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या टॉयलेटमध्ये पुरुषांनी अशाप्रकारे प्रवेश केल्याच्या अनेक बातम्या यापूर्वी पाहायला मिळाल्यात. महिलांच्या टॉयलेटमध्ये छुपे कॅमेरा लावून शुटींग करण्याचे प्रकारही अनेकदा समोर आलेत. मात्र आताचा प्रकार हा थेट विद्यापीठासारख्या संवेदशनशील ठिकाणी घडल्याने यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
