लोळसूर येथील उड्डाणपुलासाठी 40 कोटीबेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्ह्यातील अनेक रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. तब्बल 106 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 18 राज्य महामार्ग व जिल्ह्यांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. खासदार जगदीश शेट्टर यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला असून त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
जांबोटी-रबकवी राज्य महामार्गावरील राष्ट्रीय (एनएच4) महामार्गापासून किल्ला सर्कलपर्यंतच्या डांबरीकरणासाठी 1 कोटी रुपये, रायचूर-बाची रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 1 कोटी रुपये, महाराष्ट्र बॉर्डर ते सुतगट्टी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 4 कोटी रुपये, अक्कतंगेरहाळ-मडवाळ व हुमनाबाद-ममदापूर 4 कोटी रुपये, गोकाक आरटीओ कार्यालय परिसर 2 कोटी रुपये, संकेश्वर संगम 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
रस्त्यांसोबतच उड्डाणपुलासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. घटप्रभा नदीवर लोळसूर येथील उड्डाणपुलासाठी 40 कोटी, अरभावी-चल्लकेरी 6 कोटी, गोकाक-सौंदती रोडवरील उड्डाणपुलासाठी 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.बेळगाव तालुक्यातील रस्त्यांचा होणार विकाससर्वाधिक निधी हा बेळगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी देण्यात आला आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून मागणी होत असलेले रस्ते चकाचक होणार आहेत. वडगाव-धामणे-अवचारहट्टी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 4 कोटी रुपये, येळ्ळूर-अवचारहट्टी-यरमाळ रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 1 कोटी रुपये, वाघवडे-लक्ष्मीनगर अप्रोच रोडसाठी 1 कोटी रुपये, रणकुंडये ते व्हीटीयूपर्यंतच्या रस्त्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
