#शिवजयंती झेंडे लावताना काळाचा घाला, 2 जणांचा जागीच मृत्यू

#शिवजयंती झेंडे लावताना काळाचा घाला, 2 जणांचा जागीच मृत्यू

मनमाड-नांदगावं मार्गांवर हायड्रॉ क्रेनला जबर धडक

महाराष्ट्र @नाशिक : मनमाड-नांदगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पोलवर शिवजयंतीसाठी क्रेनवरुन झेंडे लावत असताना काळाने घाला घातला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी आहेत.जखमींना जवळच्या रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे.
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
मनमाड-नांदगाव रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलवर शिवजंयतीच्या निमित्ताने झेंडे लावण्याचे काम सुरु आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत झेंडे लावण्याचे काम सुरु होते. झेंडे लावत असतानाच भीषण अपघाताची घटना घडली. ट्रकने क्रेनला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला.यामध्ये दोन जणांना जीव गमावावा लागला. ट्रकने हायड्रॉ क्रेनला जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अजय पवार आणि चार्ल्स फ्रांसिस अशी मयतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
शिवजयंतीच्या निमित्ताने क्रेनवरुन झेंडे लावत असताना मनमाड-नांदगाव महामार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलवर झेंडे लावत असताना ट्रकने क्रेनला जोरदार धडक दिली. जोरदार धडक बसल्याने क्रेन पलटी झाली. त्यामुळे क्रेनवरुन झेंडे लावणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींना मनमाड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले. अपघात स्थळी व शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जातेय.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Manmad To Nandgaon road Accident  Nashik Accident

Manmad To Nandgaon road Accident

#शिवजयंती झेंडे लावताना काळाचा घाला, 2 जणांचा जागीच मृत्यू
मनमाड-नांदगावं मार्गांवर हायड्रॉ क्रेनला जबर धडक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm