बेळगाव—belgavkar—belgaum : संत सेवालाल जयंती मिरवणूक संपवून परतत असताना जिल्हा पोलिसप्रमुखांच्या (SP) कार्यालयासमोरील रस्त्यातच तरुणांच्या दोन गटात शनिवारी राडा झाला आहे. त्यामुळे, मोठा गोंधळ होऊन लोकांची गर्दी झाली होती. कुमार गंधर्व रंगमंदिरात शनिवारी संत सेवालाल जयंती कार्यक्रम झाला. जयंतीनिमित्त प्रशासनाकडून मिरवणूक काढण्यात आली होती.
ही मिरवणूक संपवून परत जात असताना जिल्हा पोलिसप्रमुखांच्या कार्यालयासमोरच दोन गटात मारामारी सुरु झाली. दोन्ही बाजूच्या महिलांनी भांडण सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी असलेल्या पोलिस हवालदारानेही भांडण आवरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे, अखेर भरारी पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूचे लोक पसार झाले.
