बेळगाव—belgavkar—belgaum : दुचाकीवरुन बेळगावला फुले आणण्यासाठी येत असताना बेळगाव-वेंगुर्ले रोडवरील कार्वे जवळ ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का लागला. यावेळी चाकाखाली सापडून एक जण जागीच ठार झाला. अझरुद्दीन नाईक (वय 39, रा. आझाद गल्ली, चंदगड, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे, गौस मादार हे गंभीर जखमी झाले.
अपघातग्रस्त ट्रॅक्टर जप्त केला असून चालक श्रीधर पाटील (राहणार ढेकोळवाडी ता. चंदगड) हा अपघातानंतर पळून गेला आहे. याप्रकरणी मृत अझरुद्दीन यांचे चुलत भाऊ सिकंदर नाईक (रा. चंदगड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करत आहेत.
