बेळगाव—belgavkar—belgaum : अनगोळ श्री कलमेश्वर बैलगाडा युवा शर्यत कमिटीच्यावतीने शनिवार दि. 8 व रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी खाली बैलगाडी ओढण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. सदर शर्यतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी कलमेश्वर बैलगाडा युवा शर्यत कमिटीच्यावतीने भव्य बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 81 हजार-चषक, द्वितीय 65 हजार-चषक, तृतीय 55 हजार-चषक, चौथे 45 हजार, पाचवे 35 हजार, सहावे 31 हजार, सातवे 25 हजार, आठवे 21 हजार, नववे 18 हजार, दहावे 16 हजार, अकरावे पारितोषिक 15 हजार, बारावे पारितोषिक 14 हजार, तेरावे पारितोषिक 13 हजार, चौदावे पारितोषिक 12,222 रुपये, पंधरावे पारितोषिक 11 हजार,
सोळावे पारितोषिक 10 हजार, सतरावे 9 हजार, अठरावे पारितोषिक 8 हजार, एकोणिसावे 7 हजार, विसावे 6 हजार, एकविसावे 5555 रुपये व लकी नंबर 31 व 41 साठी 5000 रुपये व शिल्ड देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा ही न्यु रिंग रोड अनगोळ शिवार येथे आयोजित करण्यात आली आहे तर रविवारी ही स्पर्धा संपवण्यात येणार आहे.
