Former Indian team batter and T20 World Cup winning coach Rahul Dravidकर्नाटक : मंगळवारी संध्याकाळी, भारताचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कार आणि रिक्षाचा बेंगळुरूमधील कनिंगहॅम रोडवर अपघात झालाय. कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही (Cunningham Road in Bangalore). या धडकेनंतर द्रविड गाडीची तपासणी करण्यासाठी त्याच्या वाहनातून बाहेर पडला.
त्याच्या आणि ऑटोचालकामध्ये थोडक्यात शाब्दिक देवाणघेवाण झाली. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला आहे. हा अपघात हाय ग्राऊंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.
माहितीनुसार, मंगळवार 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 : 30 वाजता बेंगळुरूच्या कनिंगहॅम रोडवर एक किरकोळ दोन्ही गाडींची टक्कर झाली जेव्हा एका ऑटोला अचानक ब्रेक लागला, ज्यामुळे राहुल द्रविडच्या कारने रिक्षाला पाठीमागून धडक दिली.
Click Here to Watch Videos or See More Photos