बेळगाव : 7 लाख रुपयांची फसवणूक #शहापूर #टिळकवाडी

बेळगाव : 7 लाख रुपयांची फसवणूक शहापूर टिळकवाडी

मायलेकावर गुन्हा

बेळगाव—belgavkar—belgaum : बँकेत कार्यरत असल्याचे भासवत बँकेतून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपली 7 लाख रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद अर्चना शिंदे (वय 45, रा. नवी गल्ली, शहापूर) यांनी टिळकवाडी पोलिसांत दिली आहे.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
या प्रकरणी पोलिसांत केके कोप्प येथील विठ्ठलराव घाटगे व त्यांची आई सरस्वती घाटगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अर्चना शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, एचडीएफसी बँकेत Recurring Deposit (RD) केल्यास जादा रक्कम मिळते, असे सांगत आपल्याला रक्कम भरायला लावली. आपण रोज युपीआय व फोनपेद्वारे विठ्ठल यांना रक्कम पाठवत होते. ही रक्कम 1 लाख 35 हजार इतकी झाल्यानंतर ती पुन्हा काढून मुदतठेव ठेवल्यास जादा रक्कम मिळेल, असे सांगत गुंतवणूक करण्याचा सल्ला विठ्ठलरावने दिला. त्यानुसार आपली विड्रॉल स्लीपवर सही घेत 1 लाख 35 हजार काढून ही रक्कम त्याची आई सरस्वती घाटगे यांच्या नावे ट्रान्स्फर केली.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
आता आपली टिळकवाडी शाखेतून कित्तूर एचडीएफसी बँकेत बदली झाल्याचे सांगितले. यानंतर ठेव बँकेत ठेवा, असे सांगत विठ्ठलराव याने 4 लाख, 2 लाख 1 एक लाख असे टप्प्याटप्प्याने 21 मार्च 2023 ते 21 ऑक्टोबर 2023 या काळात आपल्याकडून काढून घेतले. तुमची ठेव आता परत मिळणार असून, रक्कम 7 लाख 84 हजार 678 इतकी झाली आहे, असे सांगत आपल्याला एक पावती दिली.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
ही पावती घेऊन जेव्हा आपण कित्तूर येथील एचडीएफसी बँकेत गेलो तेव्हा त्यांनी अशी कोणतीही ठेव आपल्या बँकेत नसल्याचे सांगितले. शिवाय दिलेली ही पावती देखील बनावट असल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दिली आहे. यानुसार बनावट कागदपत्रे व फसवणूक कलमांतर्गत मायलेकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक परशुराम पुजेरी तपास करीत आहेत.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum fraud bank rd interest shahapur woman

belgaum fraud money news belagavi

बेळगाव : 7 लाख रुपयांची फसवणूक #शहापूर #टिळकवाडी
मायलेकावर गुन्हा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm