मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री अशी ओळख असल्या गंगा हिनं लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. गंगानं तिच्या सोशल मीडियावर लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत.
लग्नाचे हे फोटो शेअर करताना गंगानं लिहिलंय की,गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरवात. तसंच तिनं #married #justmarried असे हॅशटॅगही वापरले आहेत. गंगानं हे फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचं अभिनंद केलं आहे. तसंच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. लग्नाचे फोटो शेअर करताना गंगानं तिच्या लाइफ पार्टनरची ओळख मात्र लपवली आहे. तिची लाइफपार्टनर नेमका कोण? हे अद्याप तिनं सांगितलं नाहीये. त्यामुळं तिच्या पोस्टवर अनेकांनी याबद्दल कमेंट्स केल्यात.
खरंच लग्न की.. : गेल्या काही वर्षात अनेक सेलिब्रिटींकडून सिनेमा, मालिकांच्या प्रमोशनसाठी असे फोटो टाकून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला जातो. हे पण त्याचाच एक भाग नाही ना, असाही प्रश्न काही नेटकऱ्यांना पडला आहे.प्रणित हाटे ते गंगाचा प्रवास नव्हता सोपातर प्रणित हाटे ते गंगा होण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता, असं ती नेहमी सांगते. युवा डान्सिंग क्विनच्या मंचावर गंगानं हा प्रवास उलघडला होता.
मुंबईतल्या विद्या विहार इथं गंगा लहणाची मोठी झाली. हाटे कुटुंबात पहिल्यांदा मुलगा जन्माला आला होता. पण या मुलाची वर्तवणूक मुलींसारखीच होती. त्यामुळं लहानपणापसूनच हिणवलं जात होतं, असं गंगानं सांगितेलं. तू बायला आहे,असं मित्रांकडूनही चिडवलं जातचं. या सर्व गोष्टींचा मला मानसिक त्रास झाला होता. शेवटी मी माझ्या घरच्यांना सांगून टाकलं. काही काळ त्यांचाही राग सहन केला. परंतु नंतर घरच्यांनी मला समजून घेतलं, मला पाठिंबा दिला, असंही गंगानं म्हटलेलं.
घरच्यांनी पाठिंबा दिला.... : घरच्यांनी दिल्या या पाठिंब्यामुळं गंगाला सिनेसृष्टीत उडी घेता आली. तिला युवा डान्सिंग क्विन या रिअलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती कारभारी लयभारी मालिकेत झळकलेली. गंगाच्या या संघर्षाचं नेहमीच सगळ्यांनी कौतुक केलं आहे.
