मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात एका अजब घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ माजली आहे. खाचरोद कारागृहात एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, दुपारच्या वेळी पोलीस आरोपीसह थेट स्पा सेंटरमध्ये गेले आणि तिथे मसाजचा आनंद घेत असतानाच आरोपी पसार झाला. या प्रकारानंतर दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे.
उज्जैनच्या नागदा भागात 25 डिसेंबर रोजी शिवा बाबा शराब कंपनीच्या कार्यालयात मोठी लूट झाली होती. 5 दरोडेखोरांनी ऑफिसमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकावत तब्बल 18 लाख रुपये लुटले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रोहित शर्मा याला 5 जानेवारी रोजी खाचरोदच्या उपजेलमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला वैद्यकीय उपचारांची गरज होती.
मंगळवारी सकाळी 11 वाजता राजेश श्रीवास्तव आणि नितिन दलोदिया या दोन पोलिसांनी आरोपी रोहित शर्मा याला उपचारासाठी खाचरोदच्या सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते परत आले नाहीत. राजेश श्रीवास्तव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की आरोपी रुग्णालयातून पळून गेला आहे. यावर संशय आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेचच चौकशी सुरू केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीसह दोन्ही पोलीस बाहेर पडत असल्याचे दिसले. पुढील तपास केला असता, आरोपीला रुग्णालयातून थेट रतलाम येथील स्पा सेंटरमध्ये नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
मसाजचा आनंद घेत असतानाच आरोपी पळून गेलापोलीस आणि आरोपी यांनी 30 किमी अंतर कापत थेट रतलाममधील स्टेशन रोडवरील एका स्पा सेंटरमध्ये प्रवेश केला. तिथे तीनही जण वेगवेगळ्या खोलीत मसाजचा आनंद घेत होते. याच दरम्यान, रोहित शर्माने संधी साधून तिथून पळ काढला. पोलिसांना याचा पत्ता लागेपर्यंत तो अदृश्य झाला होता.सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्य उघडपोलिसांनी तत्काळ तपास सुरू करताच स्पा सेंटरचा डीव्हीआर जप्त करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही पोलीस स्पा सेंटरमध्ये आराम करत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर जेल अधीक्षक सुरेंद्रसिंह राणावत यांनी खाचरोद पोलिस ठाण्यात दोन्ही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
